!!गणपती बाप्पा मोरया!!
गणराया… चला तयारी करा… गणेशोत्सावासाठी पृथ्वीतलावर जायची वेळ झालीय.. मखर, डेकोरेशनचे साहित्य, फुलांच्या खरेदीने गजबजून गेलेल्या बाजारपेठा… अर्धवट असलेले देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची सुरू असलेली लगबग… मंडपात विराजमान होण्यासाठी वाजत गाजत निघालेले बाप्पा… गणरायाच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला असून पुढील अकरा दिवस सर्वत्र केवळ बाप्पा मोरयाचा गजर कानी पडणार आहे. आता उद्यापासून बारा दिवस फक्त… गणपती बाप्पा मोरया!!!